ऐतिहासिक डे-नाईट टेस्टसाठी टीम इंडिया सज्ज

पहिल्याच डे-नाईट टेस्टमध्ये विजय साकारत इतिहास रचण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय.

Updated: Nov 21, 2019, 07:03 PM IST
ऐतिहासिक डे-नाईट टेस्टसाठी टीम इंडिया सज्ज title=

कोलकाता : पहिल्याच डे-नाईट टेस्टमध्ये विजय साकारत इतिहास रचण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. कोलकाताच्या ईडन गार्डनवर शुक्रवारपासून भारत विरुद्ध बांग्लादेश डे-नाईट टेस्ट रंगणार आहे. भारतात प्रथमच डे-नाईट टेस्टचं खेळली जाणार असल्यानं क्रिकेटफॅन्ससह टीम इंडियातील खेळाडूंमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

पहिली-वहिली डे-नाईट टेस्ट खेळण्यासाठी टीम इंडियामध्ये अशाप्रकारची एक्साईटमेंट निर्माण झालीय. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर भारत विरुद्ध बांग्लादेश दरम्यान ही ऐतिहासिक पिंक टेस्ट रंगणार आहे.

वेगळ्या बॉलनं खेळणं अधिक चॅलेंजिंग असतं. बॅटींगपेक्षाही फिल्डिंग करणं अधिक चॅलेंजिंग असेल. जणूकाही हॉकी बॉलनं तुम्ही खेळताय असा भास होतो. कारण पिंक बॉलवर एक लेअर असतो आणि तो जडही असतो, असं कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे.

तर दुसरीकडे बांग्ला टायगर्सनं टीम इंडियाचा धसका नक्कीच घेतली असेल. कारण पहिल्याच टेस्टमध्ये कोहली एँड कंपनीनं बांग्लादेशला एक इनिंग राखत पराभूत केलं होतं. दोन्ही देश प्रथमच डे-नाईट टेस्ट खेळत असल्यानं दोन्हीदेशांमध्ये एक वेगळाच उत्साह संचालेला पाहयाला मिळत आहे.