तिसऱ्या टेस्टमध्येही भारताची खणखणीत सुरुवात

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्येही भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 2, 2017, 05:16 PM IST
तिसऱ्या टेस्टमध्येही भारताची खणखणीत सुरुवात title=

दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्येही भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं ४ विकेट गमावून ३७१ रन्स केल्या आहेत. दिवसाअखेरीस कॅप्टन विराट कोहली १५६ रन्सवर नाबाद आणि रोहित शर्मा ६ रन्सवर नाबाद खेळत आहे.

या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण स्कोअरबोर्डवर ४२ रन्स असताना शिखर धवन २३ रन्सवर आऊट झाला. तर त्यानंतर बॅटिंगला आलेल्या चेतेश्वर पुजारालाही २३ रन्सच बनवता आले. पण मुरली विजय आणि विराट कोहलीनं २८३ रन्सची पार्टनरशीप केली.

मुरली विजयनं २६७ बॉल्समध्ये १५५ रन्स केल्या. मुरली विजयचं टेस्ट क्रिकेटमधलं हे ११वं शतक आहे. तर विराट कोहलीनंही विजयपाठोपाठ शतक पूर्ण केलं. विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे २०वं शतक आहे.