Team India Selector : नव्या सिलेक्टरच्या नियुक्तीमध्ये वेगळा ट्विस्ट; 'या' व्यक्तीकडे पुन्हा जाणार सर्व जबाबदारी?

BCCI ने मोठी कारवाई करत सिलेक्शन कमिटी (selection committee) बर्खास्त केली. यानंतर त्यांनी नव्या सिलेक्शन समितीसाठी अर्ज मागवले होते.

Updated: Dec 1, 2022, 08:07 PM IST
Team India Selector : नव्या सिलेक्टरच्या नियुक्तीमध्ये वेगळा ट्विस्ट; 'या' व्यक्तीकडे पुन्हा जाणार सर्व जबाबदारी? title=

Team India Selector : ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World cup) भारताचा दारूण पराभव झाल्यानंतर BCCI ने मोठी कारवाई करत सिलेक्शन कमिटी (selection committee) बर्खास्त केली. यानंतर त्यांनी नव्या सिलेक्शन समितीसाठी अर्ज मागवले होते. दरम्यान यामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. याचं कारण म्हणजे गेल्या समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan sharma) यांनी पुन्हा एकदा अर्ज केल्याचं समजतंय. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीवरून ही गोष्ट समोर आली आहे.  

गेल्या समितीतील अजून दोघांनी दिलं निवेदन

या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हरविंदर सिंह यांनी पुन्हा एकदा सिलेक्टर पदासाठी निवेदन दिलं आहे. हरविंदर हे गेल्या सिलेक्शन समितीचा भाग होते. बीसीसीआयने या समितीचा कार्यकाळ पुढे वाढवला नाही. बीसीसीआयला आतापर्यंत चेतन शर्मा आणि हरविंदर सिंह यांच्यासोबत 60 अर्ज मिळाले आहेत.

गेल्या निवड समितीमध्ये सुनील जोशी आणि देबाशीष मोहंती यांचा देखील समावेश होता. मात्र यांनी नव्या समितीसाठी अप्लाय केलं नाहीये. यामध्ये काहींची नियुक्ती 2020 तर काहींची नियुक्ती ही 2021 मध्ये करण्यात आली होती. एका वरिष्ठ राष्ट्रीय निवडकर्त्याचा कार्यकाळ हा साधारपणे 4 वर्षांचा असतो. गरज असल्यास हा कार्यकाळ पुढे वाढवण्यात येतो. अभय कुरूविला यांचा कार्यकाळ मध्येच संपला होता.

बीसीसीआयच्या नोकरीसाठी एकूण 80 एप्लिकेशन मिळाले आहेत. टीम इंडियासाठी एकूण 5 सिलेक्टर्सची समिती बनवण्यात येते. यामध्ये एक चीफ सिलेक्टर असतो. आतापर्यंत एकूण 80 लोकांनी या पदांसाठी अप्लाय केल्याची माहिती आहे. यानंतर आता बोर्डाला याबाबत निर्णय घ्यायचा आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नवी समिती तयार होऊन ती जाहीर करण्यात येणार असल्याची आशा आहे.

सिलेक्शन समितीसाठी कोणाची नावं चर्चेत

  • अजित आगरकर (26 टेस्ट, 191 वनडे)
  • नयन मोंगिया (44 टेस्ट, 140 वनडे)
  • लक्ष्मण शिवरामकृष्णन (9 टेस्ट, 16 वनडे)
  • सलिल अंकोला (1 टेस्ट, 20 वनडे)

निवड समितीत कोण होतं?

चेतन शर्मा (उत्तर विभाग) यांच्याबरोबर  हरविंदर सिंह (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबांशीष मोहंती (पूर्व विभाग) यांचा निवड समितीत समावेश होता. यांच्यातील काही सदस्यांची नियुक्ती 2020 मध्ये करण्यात आली होती.