IND vs ENG: सराव सामन्यात Virat Kohli थेट प्रेक्षकांशीचं भिडला, VIDEO होतोय व्हायरल

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली संध्या फॉर्ममध्ये नसल्याने अनेकांच्या निशाण्यावर आहे. 

Updated: Jun 25, 2022, 08:19 PM IST
IND vs ENG: सराव सामन्यात Virat Kohli थेट प्रेक्षकांशीचं भिडला, VIDEO होतोय व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली संध्या फॉर्ममध्ये नसल्याने अनेकांच्या निशाण्यावर आहे. अनेक माजी क्रिकेटपटू विराटवर टीका करत आहेत. त्यात आता विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत तो प्रेक्षकाशी थेट भीडताना दिसत आहे. विराटच्या या कृतीची काही जण प्रशंसा करतायत तर काही टीका करतायत.  

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. येथे त्याला कसोटी सामन्यानंतर वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी एक सराव सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान माजी कर्णधार विराट कोहली प्रेक्षकांशी वाद घालताना दिसला. 

टीम इंडियाच्या संघात नेट बॉलर म्हणून कमलेश नागरकोटीला घेण्यात आले आहे. हा कमलेश सराव सामना खेळत होता.  सराव सामन्यादरम्यान काही प्रेक्षक कमलेशला त्रास देत होते. ते पाहून विराटने प्रेक्षकांवर चांगलाच संतापला आणि वाद घालू लागला.त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारतीय संघ लीसेस्टरशायरसोबत सराव सामना खेळत आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांच्या संघात सहभागी झाले होते. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये बसलेले काही प्रेक्षक कमलेश नागरकोटीला त्रास देत होते. हे पाहून विराटने त्याला अडवले आणि कमलेशला त्रास देऊ नका असे सांगितले. कोहली म्हणाला, "तो इथे तुमच्यासाठी सामना खेळायला आलेला नाही." कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.