IND-W vs NZ-W: अंडर-19 वुमेंस टी-20 (Under-19 Women's T20 WC 2023) वर्ल्डकपमध्ये शेफाली वर्माच्या (Shafali Verma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने या स्पर्धेची सेमीफायनची (Under-19 Women's T20 WC 2023 semifinal) फेरी गाठली आहे. बुधवारी टीम इंडियाने श्रीलंकेच्या महिला टीमना अगदी सहजरित्या मात दिली. भारतासोबत ऑस्ट्रेलियाच्या टीमला देखील सेमीफायनलचं तिकीट मिळालं आहे. यापूर्वी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया टीमने मात दिली आहे. मात्र श्रीलंकेला नमवत टीम इंडियाने पुन्हा स्पर्धेत कमबॅक केलं आहे.
सेमीफानलमध्ये महिला टीम इंडियाला किवींशी दोन हात करावे लागणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND-W vs NZ-W) यांच्यामध्ये 27 जानेवारी म्हणजेच शुक्रवारी सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया सेमीफायनल जिंकून फायनमध्ये जाण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया कर्णधार शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करणार आहे.
गेल्या काळामध्ये खासकरून मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडच्या टीमने नेहमी भारताचं स्वप्न तोडलं असल्याचं समोर आलंय. नुकतंच न्यूझीलंडच्या हॉकी टीमने भारतीय टीमचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न तोडलं. याशिवाय 2019 साली वनडे क्रिकेट वर्ल्डकपमध्येही न्यूझीलंडच्याच टीममुळे भारताचं विश्वविजेचा होण्याचं स्वप्न भंगलं होतं. इतकंच नव्हे तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशपिमध्येही विश्वविजेता बनण्यापासून न्यूझीलंडने भारताला रोखलं होतं. या सर्व गोष्टी पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांच्या समोर आल्या असून चिंतेत भर पडली आहे.
वर्ल्डकप सुपर सिक्स राऊंडमध्ये भारतीय टीमने (IND-W vs NZ-W) सर्व ग्रुप सामने जिंकले आहेत. त्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभव स्विकारावा लागला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाने अवघ्या 10 ओव्हरमध्ये सामना आपल्या नावे केला.
आयसीसी अंडर-19 वुमेन टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताची श्वेता सेहरावतच्या नावे सर्वाधिक रन्स आहेत. तिने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 197 रन्स केले आहेत. तिचा सर्वोत्तम स्कोर हा 92 आहे. यासोबतच टीमचा खेळ देखील उत्तम आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये टीम इंडिया जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही.