T20 World cup: वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर, अमेरिकेच्या मराठमोळ्या खेळाडूकडून पाकिस्तानचा दारूण पराभव

T20 World cup : यजमान अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. अटीतटीच्या या सामन्यात सुपर ओव्हर झाली आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.

सुरभि जगदीश | Updated: Jun 7, 2024, 01:41 AM IST
T20 World cup: वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर, अमेरिकेच्या मराठमोळ्या खेळाडूकडून पाकिस्तानचा दारूण पराभव title=

T20 World cup : टी-२० वर्ल्डकपमध्ये गुरुवारी पाकिस्तान विरूद्ध अमेरिका यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मोठा उलटफेर पहायला मिळाला. यजमान अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. अटीतटीच्या या सामन्यात सुपर ओव्हर झाली आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्याच पराभवामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.

सुपर ओव्हरपर्यंत रंगला सामना

पाकिस्तान विरूद्ध अमेरिका हा उत्कंठावर्धक सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेच्या टीमने 18 रन्स केले होते. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजाने 3 वाईड चेंडू फेकले. तर अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरला ओव्हर देण्यात आली होती. या ओव्हरमध्ये सौरभने एक विकेट देखील काढली. मराठमोळ्या सौरभने त्याच्यावर दाखवलेला विश्वास खरा ठरवला आणि पाकच्या टीमला 13 रन्समध्येच रोखलं. अखेरीस या सुपर ओव्हरमध्ये 5 रन्सने पाकिस्तानचा पराभव झाला.

पाकिस्तानकडून १६० रन्सचं आव्हान

या सामन्यात अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टेक्सासमधील डॅलसमध्येग्रँड प्रायरी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावून १५९ रन्स केले होते. यावेळी पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक म्हणजेच ४४ रन्सची खेळी केली. अमेरिकेकडून Nosthush Kenjige ने ३ विकेट्स काढले. तर सौरभने 2 विकेट्स काढल्या. तर यावेळी प्रत्युत्तरात अमेरिकेच्या टीमनेही 20 ओव्हर्समध्ये 159 रन्स केले. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.

2024 च्या T20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता आणि त्यातच त्यांना कमकुवत असलेल्या अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलंय. या विजयासह अमेरिकेची टीम अ गटात दोन विजय आणि चार गुणांसह अव्वल स्थानी पोहोचलीये आहे. त्याचबरोबर भारत एका सामन्यानंतर दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा पुढील सामना ९ जून रोजी भारताविरुद्ध आहे.