जोहान्सबर्ग : टेस्ट आणि वनडे सीरिज संपल्यावर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे. टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला तर वनडे सीरिजमध्ये कोहलीच्या टीमनं इतिहास घडवत सीरिज ५-१नं जिंकली. २६ वर्षांमध्ये कोणत्याही भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिज जिंकता आली नाही. यानंतर आता ३ टी-20 मॅचची सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.
या टी-20 सीरिजमध्ये भारतीय टीममध्ये काही बदल अपेक्षित आहेत. पण शिखर धवन रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सुरुवातीचे तिन्ही बॅट्समन टीममध्ये कायम राहतील. के.एल.राहुल आणि सुरेश रैनाला टीममध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे. ऑल राऊंडर म्हणून हार्दिक पांड्या टीममध्ये कायम राहील. वनडे क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव तर फास्ट बॉलर म्हणून जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनाडकटला संधी मिळेल, असं बोललं जातंय.
शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल.राहुल, एम.एस.धोनी, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट