या फलंदाजांनी झळकावल्यात डबल सेंच्युरी

भारताच्या रोहित शर्माने आज वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. त्याने २०८ धावांची नाबाद खेळी करताना वनडेत तिसरी डबल सेंच्युरी झळकावण्याचा भीम पराक्रम केला. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 13, 2017, 04:20 PM IST
या फलंदाजांनी झळकावल्यात डबल सेंच्युरी title=

नवी दिल्ली : भारताच्या रोहित शर्माने आज वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. त्याने २०८ धावांची नाबाद खेळी करताना वनडेत तिसरी डबल सेंच्युरी झळकावण्याचा भीम पराक्रम केला. 

एका डावात दोन डबल सेंच्युरी रोहितच्या नावावर होता. त्यानंतर आता त्यात आणखी एका द्विशतकाची भर पडलीये. आतापर्यंत वनडेत पाच जणांनी डबल सेंच्युरी ठोकलीये. यात रोहितने तीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, क्रिस गेल, मार्टिन गप्टिल यांच्या प्रत्येकी एक डबल सेंच्युरी आहेत.

पाहा कोणाच्या नावावर आहेत डबल सेंच्युरी

१.सचिन तेंडुलकर(नाबाद २००) वि. द. आफ्रिका(२४ फेब्रुवारी २०१०)

२. वीरेंद्र सेहवाग(२१९) वि. वेस्ट इंडिज (८ डिसेंबर २०११)

३. रोहित शर्मा (२०९) वि. ऑस्ट्रेलिया(२ नोव्हेंबर २०१३)

४.रोहित शर्मा (२६४) वि. श्रीलंका( १३ नोव्हेंबर २०१४)

५. क्रिस गेल (२१५) वि. झिम्बाब्वे(२४ फेब्रुवारी २०१५)

६. मार्टिन गप्टिल(नाबाद २३७) वेस्ट इंडिज (२२ मार्च २०१५)

७. रोहित शर्मा(नाबाद २०१८) वि. श्रीलंका (१३ डिसेंबर २०१७)