Mumbai Indians: सध्या आयपीएल सुरु असून सर्वांचं लक्ष सध्या मुंबई इंडियन्सच्या टीमकडे जास्त आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठे बदल घडले. यावेळी रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधारपद सोपवण्यात आलं. दरम्यान आयपीएल सुरु झाल्यानंतर देखील हार्दिक आणि रोहित दोघांचं एकमेकांशी पटत नसल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. अशातच आता रोहित शर्मा टीम सोडून जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच अजून काही खेळाडू देखील मुंबई इंडियन्सला रामराम करणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सच्या कॅप्ममध्ये काहीही सुरळीत चाललं नसल्याचं दिसून येतंय. अशातच खेळाडू आता गटबाजी करताना दिसतायत. त्यासोबतच व्यवस्थापनाच्या निर्णयांचा खेळाडूंच्या मानसिकतेवरही परिणाम झाला असून त्यामुळे टीम आता अडचणीत सापडलीये. मुंबई इंडियन्सचे वरिष्ठ खेळाडू आगामी सिझनमध्ये स्वत:ला बाहेर ठेवण्याची शक्यता आहे.
एका अहवालानुसार, रोहित शर्मा सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सिझननंतर MI फ्रँचायझी सोडू शकतो. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर रोहित अजिबात खूश नसल्याचं म्हटलं जातंय. रोहितला हार्दिकची कॅप्टन्सी अजिबात आवडत नाही. त्यामुळे मॅनेजमेंट आणि रोहितचे मतभेद झाले असून रोहित शर्मा पुढच्या सिझनमध्ये मुंबईची साथ सोडू शकतो.
जेव्हापासून मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला टीमचं कर्णधार बनवलं तेव्हापासून टीमधील अनेक वरिष्ठ खेळाडू नाराज झालेत. मुंबई इंडियन्सच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे आयपीएलच्या आगामी सिझनपूर्वी टीमबाहेर जाऊ शकतात. हे दोन्ही खेळाडू स्वत: कर्णधारपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वकाही बिघडलं असतानाच कर्णधार हार्दिक पांड्यासाठी पहिली खुशखबर समोर आलीये. दुखापतीमुळे बाहेर असलेला टी-20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) तंदरुस्त झाला आहे. लवकरच तो मुंबई इंडियन्स टीममध्ये परतणार आहे.