IPL 2023: Tim David ला मुंबईचा वडापाव झाला तिखट; व्हिडीओ होतोय व्हायरल

Tim David Viral Video: परदेशी खेळाडूंनी भारताच्या खाासकरून मुंबईच्या खाण्याची भूरळ पडताना दिसते. यामध्ये मुंबईचा वडापाव म्हटलं तर काही औरच गोष्ट...असंच मुंबईच्या टीम डेविड (Tim David) सोबत मराठी प्रँक झालाय. 

Updated: Apr 2, 2023, 12:10 PM IST
IPL 2023: Tim David ला मुंबईचा वडापाव झाला तिखट; व्हिडीओ होतोय व्हायरल title=

Tim David : अखेर क्रिकेटप्रेमींची आयपीएलच्या (IPL 2023) 16व्या सिझनची प्रतीक्षा आता संपली. पहिला सामना गुजरातने (Gujarat Titans) जिंकला असून इतर टीम आपल्या पहिल्या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. प्रत्येक टीमला त्यांच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून सिझनची जोरदार सुरुवात करायची आहे. अशातच परदेशी खेळाडूंनी भारताच्या खाासकरून मुंबईच्या खाण्याची भूरळ पडताना दिसते. यामध्ये मुंबईचा वडापाव म्हटलं तर काही औरच गोष्ट...असंच मुंबईच्या टीम डेविड (Tim David) सोबत मराठी प्रँक झालाय. 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये काही मराठी कंटेट क्रिएटर टीम डेविडची मजा घेताना दिसताय. हे दोघं मराठीमध्ये बोलतायत त्यामुळे टीमला काहीही कळत नाहीये. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indains) चाहत्यांना मात्र हा व्हिडीओ तुफान आवडला आहे. 

टीम डेविडला वडापाव लागला तिखट?

या व्हिडीओमध्ये दोन मराठी मुलं टीमसोबत रील बनवण्यासाठीची कल्पना त्याला सांगतायत. यावेळी ही मुलं वडापावबाबत चर्चा करत असतात. टीमला त्याचे डायलॉग सांगताना, तुला वडापाव तिखट लागला, असं म्हण, हे देखील सांगतात. मात्र ही मुलं मराठीमध्ये बोलत असल्याने टीमला त्यांचं संभाषण कळत नाहीये. मात्र तरीही तो, Sounds Good, असं म्हणतो. 

यानंतर ही मुलं टीमला मराठी येत नसल्याचा फायदा घेत अजून त्याची मजा घेतात. अखेरीस सर्व झाल्यानंतर तुझ्यासोबत प्रँक केला असल्याचा खुलासा केला जातो. यावरून टीम देखील जोरजोरात हसू लागतो. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांतं लक्ष वेधतोय.

टीम डेविडची नेटमध्ये तुफान फलंदाजी

फलंदाज टीम डेव्हिडचा अजून एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सकडून पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये डेव्हिड त्याच्या आक्रमक फलंदाजीने 23 रन्स कुटताना दिसतोय. यावेळी पहिल्या बॉलवर 4, दुसरा बॉल वाइड आहे, दुसऱ्या बॉलवर 2 रन्स, तिसऱ्या बॉलवर 4, चौथ्या बॉलवर 6, पाचव्या बॉलवर 6 असे रन्स करत टीमने तब्बल 23 रन्स ठोकलेत.