Neeraj Chopra Health Update : कार्यक्रमादरम्यान नीरच चोप्राची तब्बेत बिघडली, डॉक्टरांनी दिलं हे कारण?

नीरज चोप्राच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती 

Updated: Aug 18, 2021, 08:35 AM IST
Neeraj Chopra Health Update : कार्यक्रमादरम्यान नीरच चोप्राची तब्बेत बिघडली, डॉक्टरांनी दिलं हे कारण?

मुंबई : भारताचा गोल्डन बॉय, ऑल्मपिकमध्ये सुवर्णपद जिंकणारा नीरज चोप्रा याची अचानक तब्बेत बिघडली आहे. नीरज चोप्रा सुवर्ण पदक जिंकल्यानंतर दहा दिवसांनी मंगळवारी पानीपतमध्ये पोहोचला. समालखाच्या हल्दाना बॉर्डरवर असलेल्या त्याच्या गावी खंडरा येथे पोहोचला. खंडरा येथील स्वागत कार्यक्रमात नीरजला स्टेजच्या मागून आणण्यात आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, अचानक तब्बेत बिघडल्यामुळे त्याला रूग्णालयात नेण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून नीरजला 3 दिवसांपासून ताप होता. मात्र त्याची कोविड चाचणी निगेटिव्ह आली. मात्र त्याला अस्वस्थ वाटत होते. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी भरपूर गर्दी असल्यामुळे कार्यक्रमही लवकर संपवण्यात आलं. 

नीरजच्या तब्बेतीबाबत दिली डॉक्टरांनी माहिती 

डॉक्टर सुशील सारवान यांनी सांगितले की, " नीरज हा सातत्याने प्रवास करत आहे आणि त्याचबरोबर गर्दीमुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले आहे. सध्याच्या घडीला नीरजला विश्रामाची नितांत गरज आहे. त्यामुळे काही दिवस नीरजला विश्रांती देण्यात यायला हवी." नीरजला काही दिवसांपूर्वी ताप आला होता आणि त्यानंतर त्याची करोना चाचणीही करण्यात आली होती. पण नीरजची करोना चाचणी निगेटीव्ह आली होती. त्यामुळे नीरजला करोना झाला नसल्याचे सर्वांसमोर आले आहे. पण सुवर्णपदक जिंकल्यावर नीरज हा सत्कार सोहळ्यांसाठी सातत्याने प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळेच त्याची तब्येत बिघडली असल्याचे आता समोर आले आहे.

टोक्यो ऑल्मपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर भालाफेक खेळाडू नीरच चोप्रा याची तब्बेत अचानक बिघडली. यामुळे शुक्रवारी हरियाणा सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. तो या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहे.