आर. आश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, केली झकास कामगिरी

पहिल्या सामन्यामध्ये आर. आश्विनने केली लाखमोलाची कामगिरी

Updated: Sep 28, 2022, 11:22 PM IST
आर. आश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, केली झकास कामगिरी  title=

ind vs sa t20 match :  भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 107 धावांचा पाठलाग करताना  के. एल. राहुल आणि सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यामध्ये अनुभवी गोलंदाज आर. आश्विनने झकास कामगिरी केली आहे. (R. Ashwin Best Spell)
 
आश्विनने ((R. Ashwin) आजच्या सामन्यामध्ये चार ओव्हरमध्ये अवघ्या 8 धावा दिल्या. यातील एक ओव्हर मेडन टाकली. आश्विनला एकही विकेट मिळाली नाही पण त्याच्या कारकिर्दीतील ही दुसरा सर्वोत्तम स्पेल ठरला आहे. यामध्ये 2016 मध्ये श्रीलंकेविरूद्ध 4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. या स्पेलमध्ये त्याने 8 धावा दिल्या होत्या. 

आश्विनने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तब्बल तीन वर्षांनी पुनरागमन केलं आहे. आयपीएलमध्ये त्याने चमकदार कामगिरी करत निवडकर्त्यांना आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. आश्विनची येत्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही निवड झाली आहे. 

आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी  107 धावांचे माफक आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या जोडीने तिसऱ्या विकेट्ससाठी नाबाद  93 धावांची विजयी भागादीरी केली.