हरलेल्या पाकिस्तानच्या संघावर नेटकऱ्यांचा हल्लाबोल

मीम्स आणि फोटोंचा वापर करत केलेले हे ट्विट पाहा

Updated: Sep 24, 2018, 11:49 AM IST
हरलेल्या पाकिस्तानच्या संघावर नेटकऱ्यांचा हल्लाबोल title=

मुंबई : आशिया कप २०१८ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने पुन्हा एकदा क्रीडारसिकांची मनं जिंकली. त्यातही भारतीय संघाच्या विजयामुळे रविवारची सुट्टी मार्गी लागली अशीच अनेक चाहत्यांची भावना आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या फटकेबाजीच्या बळावर भारतीय संघाने पाकिस्ताविरोधातील दुसरा सामना जिंकला आणि आशिया कप २०१८ या मालिकेत विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं. 

शोहेब मलिक वगळता पाकिस्तानच्या संघातून कोणत्याच फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. पण, त्यातही २३८ धावांचं आव्हान त्यांनी भारतासमोर ठेवलं आणि 'रो हिटमॅन'ने शिखरच्या साथीने ते आव्हान अगदी सहजपणे स्वीकारलं. 

सोशल मीडियावर अवघ्या काही क्षणांमध्येच या सामन्यातील विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करण्यात आलं. त्यातच काही नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या पराभवानंतर त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. 

संघाच्या वाट्याला वारंवार येणाऱ्या अपयशामुळेच त्यांच्यावर या उपरोधिक टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

मीम्स म्हणू नका किंवा मग एखादा फोटो, नेटकऱ्यांनी अनेक मार्गांनी पाकिस्तानच्या संघाला निशाण्यावर घेतल्याचं पाहायला मिळालं.