Video : भारतीय संघाला हादरवणारा नसीम शाह झाला भावूक; मैदानातून बाहेर पडताना अश्रु अनावर

पाकिस्तानचा 19 वर्षांचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने जबरदस्त कामगिरी केली

Updated: Aug 29, 2022, 09:37 PM IST
Video : भारतीय संघाला हादरवणारा नसीम शाह झाला भावूक; मैदानातून बाहेर पडताना अश्रु अनावर title=

Ind vs Pak : आशिया कप स्पर्धेत  (Asia Cup 2022) भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा (IND vs PAK) पाच विकेट राखून पराभव केला आहे. भारताने हा सामना जिंकत गेल्या वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला असला तरी एका खेळाडूची मात्र चांगलीच चर्चा रंगलीय. 

पाकिस्तानचा 19 वर्षांचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. भारतीय क्रिकेट चाहत्यांनीही नसीमच्या कामगिरीचं कौतुक केलं. 

पाकिस्तानच्या युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहाने केलेली फलंदाजी सर्वांनीच पाहिली. त्यामुळे तो साऱ्यांच्याच कौतुकाचा पात्र ठरला. मात्र पराभव झाल्यामुळे तो हळवा झाला. मैदानातून परतताना तो रडत होता. नसीम रडत रडत ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि त्याचवेळी त्याला पाणी देण्यात आले तेव्हा तो पाणी घेण्यास नकार देताना दिसला.

डीबीटीव्ही स्पोर्ट्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून ही व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आली आहे. नसीम जेव्हा मैदानातून परतत होता तेव्हा तो हाताने चेहरा झाकलेला दिसला. तो अश्रू पुसत होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DBTV Sports (@dbtvsports)

नसीमच्या खेळीमुळे पाकिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. नसीमने पहिल्याच षटकात केएल राहुलला गोल्डन डकवर क्लीन बोल्ड केले. यानंतर त्याने सूर्यकुमार यादवलाही बोल्ड केले. नसीमने चार षटकांत २७ धावा देत दोन बळी घेतले. चौथ्या षटकात वेदना होत असतानाही त्याने गोलंदाजी करणे थांबवले नाही.