व्हिडिओ : शिखर धवन १० रन्सवर आऊट पण प्रेक्षकांनी वाचवलं

७२ रन्सचा शानदार खेळ करणारा शिखर धवन खूप नशिबवान ठरला. 

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 19, 2018, 02:41 PM IST
व्हिडिओ : शिखर धवन १० रन्सवर आऊट पण प्रेक्षकांनी वाचवलं

नवी दिल्ली : भुवनेश्वर कुमारची (५/२४) सर्वात बेस्ट बॉलिंग आणि शिखर धवन (७२) च्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या टी २० सामन्यात आफ्रिकेला २८ रन्सने मात दिली. 

यामुळे यजमान आफ्रिकेसंघाला ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी मात दिली. 

शिखर १० रन्सवर 

७२ रन्सचा शानदार खेळ करणारा शिखर धवन खूप नशिबवान ठरला. ३.२ ओव्हरमध्ये शिखर धवन १० रन्सवर खेळत होता.

त्यावेळी टीम इंडियाचा स्कोअर ४३ वर १ विकेट असा होता. दरम्यान, जुन्यियर डालाच्या बॉलिंगमध्ये रोहित शर्मा २१ रन्स करुन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. 

शिखर धवन वाचला 

धवनने शॉट खेळायचा प्रयत्न केला पण बॉल विकेटकिपरच्या हातात जाऊ बसला.

स्टेडियममध्ये बसलेल्या दर्शकांनी ओरडायला सुरूवात केली. त्यामुळे बॉलचा बॅटला झालेला टच ऐकू आला नाही.

अंम्पायर आणि बॉलर दोघांनीही एज ऐकली नाही आणि शिखर धवन आऊट होण्यापासून वाचला. 
 
 त्यानंतर टीम इंडियाच्या 'गब्बर' शिखर धवनन ७२ रन्सची शानदार खेळी केली. यासाठी ३९ बॉल्समध्ये १० फोर आणि २ सिक्स मारले.