विलासपूर : क्रिकेट हा एक आव्हानात्मक तितकाच धोकादायक खेळ. विजय हजारे ट्रॉफीत याची प्रचिती पुन्हा एकदा आली. या स्पर्धेदरम्यान दिल्लीने उत्तर प्रदेशला ५५ धावांनी आघाडी घेत चांगलीच टक्कर दिली. मात्र, यावेळी सर्वात लक्षवेधी आणि तितकीच रोमांचक खेळी ठरली ती उन्मुक्त चंद याची.
सामना सुरू होताच सलामिला उतरलेल्या उन्मुक्त चंदनच्या जबड्यावर चेंडू आदळला. त्याला प्रचंड मोठी जखम झाली. मात्र, जखमी अवस्थेतही त्याने जोरदार किल्ला लढवला. त्याने जखमी आवस्थेतही शतकी (११६ धावा) खेळी केली. उन्मुक्तच्या शतकी खेळीमुळे संघाला मोठी धावसंख्या (३०७) उभारता आली. आपल्या शतकी खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. ही सर्व खेळी त्याने जबड्याला खोलवर जखम झाली असताना केली.
And @UnmuktChand9 makes it. Well played Champ pic.twitter.com/CdWJeVllv8
— Shailendra Panwar (@ImShailu483) February 5, 2018
व्हिडिओ येते पहा
Brave effort Unmukt... well batted. . wishing you a speedy recovery @UnmuktChand9 pic.twitter.com/hfzmjfbtCl
— Anjum Chopra (@chopraanjum) February 5, 2018
दरम्यान, क्षणाक्षणाला उत्कंटा वाढवणारी आणि रोमांचीत करणारी खेळी पाहून प्रेक्षकांना अनिल कुंबळेची आठवण आली. २००२मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या टेस्ट सामन्यात अनिल कुंबळेच्या जबड्याला चेंडू लागला होता. तेव्हा खोलवर जखम असतानाही अनिल कुंबळेने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता.