मुंबई : भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाने चौथ्यांदा विश्वचषक जिंकला.
2018 ची सुरूवात अंडर 19 ने अगदी धमाकेदार केली. मात्र असं सगळं असलं तरीही कोच राहुल द्रविड मात्र खूष नाही. BCCI वर कोच राहुल नाराज असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने बीसीसीआयला सवाल केला आहे की, मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसांत इतकं अंतर का? BCCI ने कोच राहुल द्रविडला 50 लाख रुपये, सपोर्ट स्टाफला 20- 20 लाख रुपये आणि संघातील खेळाडूंना 30 -30 लाख रुपये बक्षिस जाहीर केलं होतं.
राहुल द्रविडपेक्षा इतर कोचिंग स्टाफला मिळालेली रक्कम ही तुलनेत कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविडने संपुर्ण कोचिंग स्टाफला एकसमान रक्कम दिली गेली पाहिजे असं आवाहन बीसीसीआयला केलं आहे. सोबतच स्टाफमध्ये मतभेद केला जाऊ नये असंही म्हटलं आहे. राहुल द्रविडने बोर्डाला स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, 'स्टाफने एका टीमप्रमाणे काम केलं आहे, ज्याचा परिणाम आपण वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी झालो. यामुळे प्रत्येकाला समान बक्षिस मिळालं पाहिजे'. तरीही बीसीसीआयने केलेल्या या फरकामुळे राहुल द्रविड आता नाराज आहे.