VIDEO: युजवेंद्र चहल करतोय अशी तयारी, हार्दिक पांड्याची काढणार विकेट

आयपीएलचं धुमशान लवकरच पहायला मिळणार आहे. संपूर्ण टीम विभागण्यात आल्या आहेत आणि सर्वांचीच तयारी जोरदार सुरु आहे. सर्वच टीम्स विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. अशाच प्रकारे टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल हा सुद्धा तयारी करत आहे.

Sunil Desale Updated: Mar 30, 2018, 08:19 PM IST
VIDEO: युजवेंद्र चहल करतोय अशी तयारी, हार्दिक पांड्याची काढणार विकेट title=

नवी दिल्ली : आयपीएलचं धुमशान लवकरच पहायला मिळणार आहे. संपूर्ण टीम विभागण्यात आल्या आहेत आणि सर्वांचीच तयारी जोरदार सुरु आहे. सर्वच टीम्स विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. अशाच प्रकारे टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल हा सुद्धा तयारी करत आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

युजवेंद्र चहल यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा हिस्सा असणार आहे. आयपीएलची औपचारिक सुरुवात होण्यापूर्वी युजवेंद्र चहलने नेमबाजीत आपला ठसा उमटवताना दिसला. यासंदर्भातला एक व्हिडिओही युजवेंद्र चहलने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

व्हिडिओ पोस्ट करत चहलने म्हटलं...

या व्हिडिओत चहल नेमबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना चहलने म्हटलं... "आयपीएलपूर्वी निशाना लावण्याचा सराव. यंदाच्या आयपीएलमध्ये नंबर एक लक्ष्य हार्दिक पांड्या आहे." हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हिस्सा आहे.

प्रत्येक टीम चहलला खरेदी करण्यास उत्सुक

सध्या चांगल्या प्रदर्शनामुळे युजवेंद्र चहलची सर्वत्र चर्चा होत आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंके विरोधात झालेल्या सीरिजमध्ये त्याने सर्वाधिक विकेट्स घेतले होते. त्यामुळे आयपीएलमध्ये प्रत्येक टीम त्याला खरेदी करण्यास उत्सुक होती. 

आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलची बेस प्राईस यावेळी २ कोटी ठेवण्यात आली होती. मात्र, बोली सुरु झाल्यानंतर ती ६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. दिल्ली डेअरडेविल्सने चहलसाठी ६ कोटींची बोली लावली त्यावेळी याच प्राईसवर बंगळुरुच्या टीमने आरटीएमचा वापर करत पुन्हा आपल्या टीममध्ये घेतलं.

युजवेंद्र चहलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर होताच चहलच्या चाहत्यांनी त्याला लाईक करणण्यास सुरुवात केली. अनेकांनी म्हटलं की, आता चहल दोनवेळा हार्दिक पांड्याची विकेट घेईल. इतकचं नाही तर चहलची टीम आयपीएल चॅम्पियन बनेल असंही अनेकांनी म्हटलं आहे.