Vijay Hazare Trophy: श्रेयस अय्यर मुंबई संघाचा कर्णधार, पृथ्वी शॉला महत्त्वाची जबाबदारी

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा 22 दिवस 38 संघांमध्ये चालणार आहे. 

Updated: Feb 10, 2021, 06:20 PM IST
Vijay Hazare Trophy: श्रेयस अय्यर मुंबई संघाचा कर्णधार, पृथ्वी शॉला महत्त्वाची जबाबदारी title=

मुंबई: इंग्लड विरुद्ध भारत 4 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यांवर सर्वांचं लक्ष असणार आहेच. पण त्याच बरोबर विजय हजारे ट्रॉफीसाठी देखील सामने सुरू होत आहे. 20 फेब्रुवारीपासून 22 दिवस ही स्पर्धा सुरू असणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई संघातून श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 

श्रेयस अय्यर मुंबई संघाचा कर्णधार असणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) बुधवारी आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी श्रेयस अय्यरची मुंबई संघाचा कर्णधार म्हणून निवड केली. तर पृथ्वी शॉला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे अय्यरने सय्यद मुश्ताक अली बाहेर राहिला आहे.

मुंबई संघ भारी पडणार?
यंदा विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तम गोलंदाज मुंबई संघाकडून खेळणार आहेत. त्यामुळे मुंबई संघ सर्वांवर भारी पडणार का याकडे आता लक्ष आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि अखिल हरवडकर संघातून खेळणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तरे देखील आहे. श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉकडे संघाची कमान सांभाळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. 

विजय हजारे ट्रॉफी कधी आणि कुठे?
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा 22 दिवस 38 संघांमध्ये चालणार आहे. 6 गटांमध्ये 38 संघांना विभागण्यात आलं आहे. त्यानुसार 6 ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. 

स्पिनर यजुवेंद्र चहलच्या पत्नीचा श्रेयस अय्यरसोबत जबरदस्त डान्स

मुंबई संघात कोणकोण आहेत?
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, यशस्वी जायस्वाल, अखिल हेरवाडकर, सरफराज खान, चिन्मय शंकर, आदित्य तारे, हार्दिक तमोर, शिवम दूबे, आकाश पारकर, आतिफ अटवाल, आतिफ अटवाल अंकोलेकर, साईराज पाटील, सुजीत नायक, तनुश कोटियन, प्रशांत सोलंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राऊत, आणि मोहित अवस्थी.