Vinesh Phogat: आज ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी एक मेडल येणार होतं. मंगळवार रात्रीनंतर सर्व भारतीयांनी कुस्तीपटू विनेश फोगटकडून गोल्ड मेडलची अपेक्षा केली होती. मात्र अशा परिस्थितीत विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आलं. 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. या निर्णयामुळे सर्व भारतीयांचं मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं. अशातच आता डिस्क्वालिफाय झाल्यानंतर विनेशचा पहिला फोटो हॉस्पिटलमधून समोर आला आहे.
विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. याच कारणामुळे ती गोल्ड मेडलच्या सामन्यात खेळू शकली नाही. एवढंच नाही तर तिला एकही पदक मिळालं नाही. यानंतर विनेशची प्रकृती खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी भेट घेतली आहे. अपात्र ठरल्यानंतर विनेशचा पहिला फोटो समोर आला असून, त्यात पदक न मिळाल्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतंय.
President of the Indian Olympic Association (IOA) PT Usha met Indian wrestler Vinesh Phogat, in Paris, France
She was disqualified today from the Women’s Wrestling 50kg for being overweight.
(Pic source: IOA) pic.twitter.com/eKRCilr2lG
— ANI (@ANI) August 7, 2024
हॉस्पिटलमधून समोर आलेल्या विनेश फोगटच्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर हसू आहे. मात्र तरीही तिच्या चेहऱ्यावर पदक न मिळाल्याचं दु:ख पाहायला मिळतंय. या फोटोमध्ये विनेशचे केस कापल्याचं दिसून येतंय, तिचे डोळे सुजले असून हाताला सलाईन लावलं आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी तिची भेट घेतली असून त्या विनेशला धीर देत असल्याचं दिसत होतं.
कुस्तीमध्ये, कोणत्याही कुस्तीपटूला फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची सूट मिळते. त्यामुळे विनेशचे वजन 50 किलो किंवा 100 ग्रॅम असतं तर ती गोल्ड मेडलची लढत खेळू शकली असती, पण तिचे वजन 50 ग्रॅम जास्त होतं आणि त्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगलं. कुस्तीमध्ये कुस्तीच्या सामन्यांपूर्वी प्रत्येक खेळाडूचं वजन केलं जातं. याशिवाय कुस्तीपटूला त्याच श्रेणीत आपलं वजन 2 दिवस राखायचं असतं, परंतु विनेशला तसं करता आलं नाही.