माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी विरोधात अदखलपात्र गुन्हा

संगीत दिग्दर्शक अंकुर तिवारीचे वडील रजेंद्रकुमार तिवारी यांनी विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप लावला आहे.

Updated: Jul 2, 2018, 11:07 AM IST
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी विरोधात अदखलपात्र गुन्हा title=

मुंबई:  माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अॅन्ड्रिया विरोधात मारहाणीची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संगीत दिग्दर्शक अंकुर तिवारीचे वडील रजेंद्रकुमार तिवारी यांनी विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप लावला आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

अंकुर तिवारी गायक अंकित तिवारीचा भाऊ आहे. रविवारी गोरेगावच्या इन ऑर्बीट मॉलमध्ये हात लागल्याच्या संशयावरून अँड्रियानं राजेंद्र कुमार यांना मारहाण केली. त्यानंतर वडीलांना मारहाण केल्याचा जाब विचारायला गेलेल्या अंकुर तिवारीला देखील शिवीगाळ आणि धक्का बुक्की केल्याचा अंकुरचा आरोप आहे. ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीत कैद झाली असून सध्या बांगूरनगर पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

vinod kambli

पोलिसांकडून तपास सुरू

दरम्यान, एका व्यक्तीने आपल्याला चुकीचा स्पर्ष केल्याने आपण त्या व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप विनोद कांबळी याच्या पत्नीने केला आहे.