जबरदस्त | सामन्यादरम्यान मैदानात कुत्र्याची एंट्री, बॉलसाठी फिल्डर्सना पळवलं, पुढे काय झालं?

सगळ्या फॅन्सला अडवू शकतो पण याला कोण अडवणार, क्रिकेटच्या मैदानातील कुत्र्याच्या जबरदस्त फिल्डिंगचा व्हिडीओ

Updated: Sep 12, 2021, 08:11 PM IST
जबरदस्त | सामन्यादरम्यान मैदानात कुत्र्याची एंट्री, बॉलसाठी फिल्डर्सना पळवलं, पुढे काय झालं? title=

मुंबई: काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या मैदानात कोंबड्याची एन्ट्री झाली होती. त्यानंतर आता आणखी एका प्राण्याने क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सगळ्या फॅन्सला मैदानात अडवू शकतो मात्र या फॅनला कोण अडवणार असा प्रश्न पडला आहे. हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की सामना सुरू आहे. फिल्डिंग करणारी टीम आऊट करण्यासाठी धाडपड करत आहे. तेवढ्यात धावत मैदानात कुत्रा येतो. हा कुत्रा बॉल तोंडात पकडून सैरावैरा पळू लागतो. फिल्डिंग करणाऱ्या टीममधील मेंमर्सही बॉल मिळवण्यासाठी कुत्र्याच्या मागे धावत असतात. हा कुत्रा त्यांना पळवपळव पळवतो. 

शेवटी हा कुत्रा फलंदाजाच्या टीममधील एकाला बॉल देतो. तिथे पोहोचत महिला क्रिकेटपटू त्याच्याकडून बॉल घेते. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीएसएनआय क्रिकेट क्लबच्या डावाच्या 9 व्या ओव्हरदरम्यान हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना हसू आवरेनासं झालं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.