VIDEO : शिखर धवनचा मैदानातच भांगडा

व्हिडिओचा धुमाकूळ 

VIDEO : शिखर धवनचा मैदानातच भांगडा

मुंबई : लंडनच्या ओवल मैदानात भारत आणि इंग्लडमध्ये 5 टेस्ट मॅचची सिरीजमधील शेवटचा सामना खेळला गेला. इंग्लंडने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये खेळत होते. यामुळे ओवल मैदानात उपस्थित असलेले भारतीय प्रेक्षक अत्यंत खूष झाले. प्रेक्षकांनी हा क्षण साजरा केला आणि जोरजोरात ढोल वाजवू लागले. जेव्हा स्टेडिअममध्ये ढोलचा आवाज ऐकू आला तेव्हा स्वतः शिखर धवनने त्यावर ढेका धरला. 

शिखर धवन बाऊंड्रीवर फिल्डींग करत होता. ढोलचा आवाज ऐकताच शिखर धवनने त्यावर ठेका धरला. यामुळे भारतीय प्रेक्षक आणखी खूष झाले. चाहत्यांनी शिखर धवनचा हा भांगडा कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला. शिखरला असा भांगडा करताना कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला हरभजन सिंह स्वतःला रोखू शकला नाही त्याने देखील भांगडा करायला सुरूवात केली. 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आपल्याला माहित आहे शिखर धवन हा मनमौजी माणूस आहे. त्याचा हा व्हिडिओ प्रत्येकालाच उत्साह देणारा आहे.