VIDEO: विराटचा हैदराबादच्या प्रेक्षकांना बघून इशारा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १० विकेटनं विजय झाला.

Updated: Oct 14, 2018, 08:52 PM IST
VIDEO: विराटचा हैदराबादच्या प्रेक्षकांना बघून इशारा

हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १० विकेटनं विजय झाला. याचबरोबर २ टेस्ट मॅचची ही सीरिजही भारतानं २-०नं खिशात टाकली. पहिल्या मॅचप्रमाणेच ही मॅचदेखील तिसऱ्याच दिवशी संपली. भारतीय टीमच्या शानदार बॅटिंग आणि बॉलिंगमुळे वेस्ट इंडिजनं लोटांगण घातलं. एकतर्फी होत असलेल्या या मॅचमुळे हैदराबादच्या स्टेडियममध्ये आलेल्या प्रेक्षकांमध्येही निरुत्साहाचं वातावरण होतं. त्यामुळे विराट कोहलीनं प्रेक्षकांकडे बघून इशारा केला. विराटनं प्रेक्षकांना आरडा-ओरडा करण्याचा इशारा करून भारतीय टीमला चीअर करायल सांगितलं. 

विराट कोहलीच्या या आवाहनला प्रेक्षकांनीही जोरदार प्रतिसाद दिला. बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. क्रिकेट रसिकही या व्हिडिओला पसंत करत आहेत.