सर्वाधिक डबल सेंच्युरी करणारा विराट ठरलाय पहिला कर्णधार

भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटमध्ये विक्रमांचे नवनवे इमले रचतोय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 3, 2017, 11:08 AM IST
सर्वाधिक डबल सेंच्युरी करणारा विराट ठरलाय पहिला कर्णधार title=

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटमध्ये विक्रमांचे नवनवे इमले रचतोय.

विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. कर्णधार म्हणून विराट कोहलीने सर्वाधिक डबल सेंच्युरी करणारा विराट पहिला क्रिकेटर ठरलाय.

त्याने क्रिकेटमधील अनेक दिग्गजांना मागे टाकलंय. कर्णधार म्हणून विराटने ६ डबल सेंच्युरी झळकावल्या. वेस्ट इंडिजच्या लाराच्या नावावर ५ डबल सेंच्युरी आहेत. कर्णधार असताना ब्रॅडमन, मायकल क्लार्क आणि ग्रॅम स्मिथ यांनी ४ डबल सेंच्युरी झळकावल्या होत्या.

सलग दुसऱ्या इनिंगमध्ये डबल सेंच्युरी

कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सलग दुसऱ्या इनिंगमध्ये कोहलीने सलग दुसरी डबल सेंच्युरी ठोकलये.