लंकेच्या भूमीवर दोन मालिका जिंकणारा कोहली ठरला पहिला कर्णधार

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलीये. या विजयासह कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झालीये.

Updated: Aug 7, 2017, 03:09 PM IST
लंकेच्या भूमीवर दोन मालिका जिंकणारा कोहली ठरला पहिला कर्णधार title=

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलीये. या विजयासह कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झालीये.

श्रीलंकेच्या मैदानावर दोन मालिका जिंकणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरलाय. याआधी २०१५मध्ये विराटच्या कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला त्यांच्यात मातीत धूळ चारली होती. 

तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा २-१ असा पराभव केला होता. सध्या सुरु असलेल्या मालिकेतील तिसरा सामना श्रीलंकेच्या पाल्लेकेले येथे खेळवला जाणार आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने चौथ्याच दिवशी विजय मिळवला. ६२२ धावांचे तगडे आव्हान ठेवताना श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांवर आटोपला. त्यानंतर फॉलोऑन मिळालेला श्रीलंकेचा दुसरा डाव ३८६ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने हा ५३ धावांनी विजय मिळवला.