विराट आहे वनडेचा बादशाह, हा आहे पुरावा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीत दररोज नवनवे विक्रम करतोय. सध्या विराटच्या तोडीचा कोणताच फलंदाज नसल्याचे अनेक क्रिकेट तज्ञांचे म्हणणे आहे. 

Updated: Oct 28, 2017, 10:34 AM IST
विराट आहे वनडेचा बादशाह, हा आहे पुरावा title=

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीत दररोज नवनवे विक्रम करतोय. सध्या विराटच्या तोडीचा कोणताच फलंदाज नसल्याचे अनेक क्रिकेट तज्ञांचे म्हणणे आहे. 

वनडेमद्ये या वर्षी विराट बादशाह ठरलाय. या वर्षी वनडेत आतापर्यंत विराटने १३४७ धावा केल्यात. हे वर्ष अद्याप संपलेले नाही. त्यामुळे त्याच्या खात्यात आणखी धावांची भर पडेल यात शंकाच नाही. 

१३४७ धावांसह विराट या वर्षातील वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. विराटने २५ सामन्यांत ही कामगिरी केलीये. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा ज्यो रुट आहे. रुटने १९ सामन्यांत ९८३ धावा केल्यात. दरम्यान रुट विराटपेक्षा फार मागे आहे. 

तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा डी कॉक आहे. त्याने १९ सामन्यांत ९५६ धावा केल्या. चौथ्या स्थानावर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आहे. रोहितने १७ सामन्यांत ९२९ धावा केल्यात. विराटने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत पाचव्यांदा एका वर्षात एक हजाराहून अधिक धावा केल्यात. 

२००८मध्ये विराटने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००८ या वर्षात त्याने वनडेत १५९ धावा केल्या. त्यानंतर २००९मध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्या वर्षी त्याने ३२५ धावा केल्या. 

विराटने २०११ मध्ये १३८१, २०१२मध्ये १०२६, २०१३मध्ये १२६८ आणि २०१४मध्ये १०५४ धावा केल्यात. गेल्या दोन वर्षात त्याला एक हजार धावा पूर्ण करु शकला नाही. मात्र यंदाच्या वर्षा त्याने हजार धावा पूर्ण केल्या.