विराट सर्वश्रेष्ठ खेळाडू: रवी शास्त्री

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली हा सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरला असल्याचे म्हटले आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 17, 2018, 04:12 PM IST
विराट सर्वश्रेष्ठ खेळाडू: रवी शास्त्री

सेंच्युरियन : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली हा सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरला असल्याचे म्हटले आहे. 

विराटला पर्याय नाही - शास्त्री

विराट कोहली, जो रूट, केन विल्यम्सन आणि स्टीव्हन स्मिथ यांना वर्तमान काळात जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून ओळखले जाते. पण, शास्त्री यांचे म्हणने असे की, कोहलीला कोणीही पर्याय ठरू शकत नाही. दक्षिण अफ्रिकेत झालेल्या मालिकेत भारतीय संघाने मिळवलेल्या यशाबाबत विचारले असता शास्त्री यांनी म्हटले आहे की, हा विजय म्हणजे केवळ धावांचा विषय नाही. मैदानावर आपण ज्या पद्धतीने धावा जमवता त्याच्या संघावर प्रचंड प्रभाव पडतो. विराटची कामगिरी पाहून मी असे म्हणतो की, विराट हा जगातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे.

करिअरमधली ८ ते ९ वर्षेच राहिली...

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेतील विजयाबाबत प्रतिक्रीया देताना, आपला उत्साह कायम ठेवत सदैव सदिच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानत विराट आपल्या प्रितक्रियेत म्हणतो,  'माझ्या क्रिकेट करिअरमधली अवघी आठ ते नऊ वर्षे राहिली आहेत. त्यामुळे या संधीचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा माझा विचार आहे. ही खूपच आनंदाची बाब आहे की मी तंदुरूस्त आहे आणि मला नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे.'