कोलकाता : दुस-या वनडे सामन्यातही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दमदार मात दिली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ५० रन्सने हरवले आहे. आता या ५ वनडे सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेतली आहे.
विराट कर्णधार झाल्यानंतर त्याच्या नेतृत्वातील हा सलग आठवा विजय आहे. विराटने कर्णधार झाल्यापासून हा कारनामा तीनदा केलाय. त्याच्याआधी हा कारनामा माजी कर्णधार सौरव गांगुली, महेंद्र सिंह धोनी आणि राहुल द्रविड यांच्या नावावर होता. पण या सर्वांनी हा कारनामा केवळ एकदाच केला होता.
कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने हा कारनामा तीन वेळा केला आहे. विराटने २०१३-१४, २०१४-१७ आणि २०१७ मध्ये हा कारनामा केला. त्याच्या या रेकॉर्डचा अंदाज यावरून घेतला जाऊ शकतो की, ऑस्ट्रेलियाचा खेळ भारतात येऊन बिघडला. ऑस्ट्रेलियाने याआधी चेन्नईमध्ये ४ सामने खेळले आणि चारही सामन्यात त्यांना विजय मिळाला. कोलकातामध्येही तिच परिस्थीती होती. मात्र कोहलीच्या टीमने त्यांच्या सर्व रेकॉर्डवर पाणी फेरलं आहे.
आता केवळ पॉंटिंग समोर -
या रेकॉर्डच्या बाबतीत कोहली हा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हंसी क्रोनीयेच्या बरोबरीत आला आहे. त्याने ३ वेळा सलग ८ सामने जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. आता कोहलीच्या पुढे केवळ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग हा आहे. रिकीने सलग ८ किंवा त्यापेक्षा जास्त सामने जिंकण्याचा कारनामा ४ वेळा केला आहे.