मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. श्रीलंकेविरूद्धची पहिली विराट कोहलीसाठी त्याच्या कारकिर्दीतील 100 टेस्ट मॅच आहे. भारताकडून 100 टेस्ट सामने खेळणारा विराट 12 खेळाडू आहे. दरम्यान या ऐतिहासिक सामन्यात विराट कोहलीने नवा आणि मोठा पल्ला गाठला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 8 हजार रन्स करणारा विराट सहावा भारतीय खेळाडू बनला आहे.
भारतासाठी टेस्टमध्ये सर्वात जास्त रन्स मास्टप ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहेत. सचिनने त्याच्या 200 टेस्ट सामन्यांमध्ये 15,921 रन्स केले आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड असून त्याने 13,265 रन्स केले आहेत. यानंतर सुनील गावस्कर तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या नावे 10,122 रन्स आहेत.
विराट कोहली व्यतिरिक्त वीवीएस लक्ष्मण आणि विरेंद्र सेहवाग यांनीही टेस्ट सामन्यात 8 हजार रन्सच्या धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानंतर आता विराटनेही हा टप्पा गाठला आहे आणि तो सहावा खेळाडू बनला आहे.