मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. श्रीलंकेविरूद्धची पहिली विराट कोहलीसाठी त्याच्या कारकिर्दीतील 100 टेस्ट मॅच आहे. भारताकडून 100 टेस्ट सामने खेळणारा विराट 12 खेळाडू आहे. दरम्यान चाहत्यांची इच्छा आहे की, कोहलीने या सामन्यात शतक झळकवावं. जर कोहलीने पहिल्या टेस्ट सामन्यात शतक झळकावलं तर असं करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरेल. आणि एक विक्रम कोहलीच्या नावे जोडला जाईल.
मात्र एक असा रेकॉर्ड आहे, ज्यापासून दूर राहणंच कोहली पसंत करणार आहे. हा रेकॉर्ड म्हणजे शून्यावर आऊट होण्याचा. आता पर्यंत टेस्टच्या इतिहासात 7 फलंदाज त्यांच्या 100 व्या टेस्टमध्ये शून्यावर आऊट झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे.
गेल्या काही काळापासून विराट कोहली टेस्टमध्ये काही खास कामगिरी करू शकलेला नाह. नोव्हेंर 2019मध्ये कोहलीने 15 टेस्टमध्ये 28.14 च्या सरासरीने केवळ 760 रन्स केले होते. यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. याचवेळी तो 4 वेळा शून्यवर बाद झाला आहे. त्यानुसार गेल्या 8 महिन्यांमध्ये कोहली 4 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
यापूर्वी भारताचे माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर त्यांच्या 100 व्या टेस्ट सामन्यात शून्यावर वाद झाले होते. तर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार एलेन बॉर्डर देखील त्यांच्या 100 व्या टेस्टमध्ये दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाले होते.
दरम्यान श्रीलंकेविरूद्धचा पहिला टेस्ट सामना सुरु असून विराट कोहली पहिल्या डावात 45 धावांवर आऊट झाला. त्यामुळे हा लाजीरवाणा विक्रम दुसऱ्या डावात घडणार नाही अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.