धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराटची पहिली प्रतिक्रिया

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार ठरलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Updated: Aug 15, 2020, 10:16 PM IST
धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराटची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार ठरलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आज संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी मी निवृत्त झाल्याचं समजावं, अशी पोस्ट धोनीने इन्स्टाग्रामवर टाकली आहे. 'मै पल दो पल का शायर हूं', हे गाणं पोस्ट करत धोनीने निवृत्त होत असल्याचं सांगितलं. 

धोनीच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक क्रिकेटपटूला एक दिवस त्याचा प्रवास थांबवावा लागतोच. तरीही तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला खूप जवळून ओळखत असाल, तर या निर्णयानंतर तुम्ही आणखी भावनिक होता. तू देशासाठी जे काही केलं आहेस, ते कायमच प्रत्येकाच्या हृदयात राहिल, असं कोहली म्हणाला आहे.