'वॉटर बॉय' विराटची फुल्ल टू धमाल, मैदानात घुसताच असं काही केलं की... सिराज देखील खदाखदा हसला; पाहा Video

Virat kohli funny Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये विराट कोहली आपल्याच मस्तीत एन्जॉय करताना दिसतोय. विराट कोहली आजच्या सामन्यात वॉटर बॉयचं काम करत आहे.

Updated: Sep 15, 2023, 06:09 PM IST
'वॉटर बॉय' विराटची फुल्ल टू धमाल, मैदानात घुसताच असं काही केलं की... सिराज देखील खदाखदा हसला; पाहा Video title=
Virat kohli funny Video

Virat kohli, Ind vs Ban : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुपर 4 मधील शेवटचा सामना खेळवला जातोय. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव करत टीम इंडिया आधीच आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता फायनल सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने असणार आहे. अशातच आता बांग्लादेशविरुद्धच्या औपचारिक सामन्यात रोहितने मोठे बदल केले आहेत. रोहितने तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात सामील केलंय. तर विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला आराम दिलाय. अशातच आता टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट (Virat kohli) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video) होताना दिसतोय.

टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांची कसरत झाल्याचं दिसून आलं. मोहम्मद शमीने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर सलामीवीर लिटल दासला तंबूत पाठवलं. एका परफेक्ट इन्सविंग बॉलवर शमीने दासच्या दांड्या उडवल्या. त्यानंतर टीम इंडियाने सेलिब्रेशन केलं. मात्र यावेळी मोठ्या उत्साहात जोश दाखवणारा विराट कोहली मैदानात नव्हता. मात्र, कोहली मैदानात अन् संधी सोडेल असं होईल का? 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये विराट कोहली आपल्याच मस्तीत एन्जॉय करताना दिसतोय. विराट कोहली आजच्या सामन्यात वॉटर बॉयचं काम करतोय. मात्र, तिथंही विराटने मस्ती करण्याची सोडलं नाही. मैदानात येताना विराट हेरा फेरी स्टाईलने धावत मैदानात आला. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसतोय.

पाहा Video

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.