लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं सेमी फायनल गाठली आहे. या मॅचमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या तीन बॅट्समनना रन आऊट केलं. या रनआऊटपैकी डेव्हिड मिलरच्या रन आऊटवेळी चांगलाच गोंधळ झाला.
अश्विनच्या बॉलिंगवर डुप्लेसीनं शॉट मारला पण तो आणि मिलरमध्ये झालेल्या गोंधळामुळे दोघंही एकाच क्रिजवर आले. यानंतर विराट कोहलीनं स्टम्पला बॉल लावला पण डुप्लेसी आऊट का मिलर यामध्येही गोंधळ झाल्यामुळे अखेर थर्ड अंपायरनं मिलर आउट असल्याचा निर्णय दिला.
Virat Kohli had the easiest of run outs of David Miller thanks to a chaotic mix up.
WATCH: https://t.co/FNo0yp4Lxu #INDvSA #CT17 pic.twitter.com/8vioq3s5ma
— ICC (@ICC) June 11, 2017