Virat Kohli : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा हॉटेल रुपमधला (Virat Kohli Hotel Room) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर विराट कोहलीने यावर नाराजी व्यक्त केली होती. भारतीय क्रिकेट संघ T20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात आहे. तेथे एका हॉटेलमध्ये संघ थांबला आहे. या प्रकरणानंतर हॉटेलने एक निवेदन जारी करत विराट कोहलीची (Virat Kohli) माफी मागितली होती. पण आता हॉटेल व्यवस्थापनाने व्हिडिओ शूट करणाऱ्या कर्मचाऱ्याला काढून टाकले आहे. सोबत पुन्हा अशी चूक होणार नाही याचं आश्वासन देखील दिलं आहे. (Hotel managment action on empolyee)
विराट कोहलीने हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर हॉटेल व्यवस्थापनेने कर्मचाऱ्यावर कारवाई करत व्हिडिओ सोशल मीडियावरुन हटवण्याचं आश्वासन दिलं आहे.
हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले की, 'अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती पावले उचलले जातील. आम्ही भारतीय क्रिकेट संघ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे माफी मागत सहकार्य करत आहोत.' आयसीसीने देखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती.
व्हिडीओमध्ये कोहलीचे शूज, खोलीत असलेल्या वस्तू दाखवण्यात आल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या रुमचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.