IPL 2022 : अरेरे! चांगलं खेळूनही कोहलीच्या नावावर 'नकोसा' रेकॉर्ड

71 दिवसांनी पुन्हा फॉर्ममध्ये आलेल्या विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

Updated: May 1, 2022, 01:37 PM IST
IPL 2022 : अरेरे! चांगलं खेळूनही कोहलीच्या नावावर 'नकोसा' रेकॉर्ड title=

मुंबई : माजी कर्णधार विराट कोहली गुजरात विरुद्धच्या फॉर्ममध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसला. मात्र तरीही कोहलीच्या नावावर नकोसा रेकॉर्ड झाला. कोहलीला पुन्हा फॉर्ममध्ये खेळताना पाहून क्रिकेटप्रेमीही खूश झाले. 

कोहलीने 71 दिवसांनंतर अर्धशतक झळकवलं. कोहली चांगलं खेळूनही त्याच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्ड नोंद झाली आहे. त्यामुळे कोहलीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. 

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीची बॅट पहिल्यांदा चालली आहे. विराट कोहलीने बऱ्याच कालावधीनंतर अर्धशतक झळकावले. कोहलीने 14 डावांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावलं. 

कोहलीने 71 दिवसांनंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावलं. त्याने 18 फेब्रुवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचे अर्धशतक झळकावलं. शनिवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्याने 53 बॉलमध्ये 58 धावा केल्या. या मोसमात 50 हून अधिक धावा करत ही सर्वात स्लो धावा केल्या.

यंदाच्या हंगामात सर्वात स्लो रन कोणी केले?

विराट कोहली- 53 बॉल- 58 धावा 
टिळक वर्मा - 43 बॉल - 51 धावा 
हार्दिक पांड्या - 42 बॉल - 50 धावा 
व्यंकटेश अय्यर - 41 बॉल 50 धावा 

आयपीएलमधील विराट कोहलीची कामगिरी

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीची सर्वात वाईट कामगिरी राहिली आहे. यंदाच्या हंगामात 10 सामन्यात त्याने 186 धावा केल्या. या मोसमातील त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 15 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. कोहलीने आयपीएलमध्ये 6469 धावा केल्या.