सिरीज जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचं जोरदार सेलिब्रेशन; Virat Kohli ने इशानसोबत लगावले ठुमके

 सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये कोहली आणि ईशान किशन (Ishan Kishan) ठुमके लगावत डान्स करताना दिसतायत.

Updated: Jan 13, 2023, 04:47 PM IST
सिरीज जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचं जोरदार सेलिब्रेशन; Virat Kohli ने इशानसोबत लगावले ठुमके title=

Virat Kohli Ishan Kishan Dance: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. दरम्यान सामन्यानंतर तो मस्तीच्या मूडमध्येही दिसून आला. टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचा (Ind vs Sl) दुसरा वनडे सामना (Second ODI) जिंकला आणि त्यानंतरचा सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये कोहली आणि ईशान किशन (Ishan Kishan) ठुमके लगावत डान्स करताना दिसतायत.

सोशल मीडियावर असा दावा करण्यात येतोय की, हा व्हिडीओ श्रीलंकेविरूद्ध खेळल्या गेलेल्या कोलकाता वनडे सामन्यानंतरचा आहे. दुसऱ्य वनडे सामन्यात टीम इंडियाने 4 विकेट्सने विजय मिळवला आणि सिरीजमध्ये 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

स्टेडियममध्ये कोहली आणि ईशानने केला डान्स

दुसरा वनडे सामना जिंकल्यानतर कोलताच्या ईडन गार्डन्समध्ये कोहली आणि इशान किशनने तुफान डान्स केला. या दरम्यान स्टॅंडमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामध्ये विराट कोहली ठुमके लगावताना दिसतोय आणि चाहते त्याला चीअर करत होते.

पहिल्या सामन्यात कोहलीने ठोकलं शतक

पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने वादळी खेळी करत शतक (Virat Kohli Century) झळकावलं. कोहलीने 80 चेंडूमध्ये 100 रन्स केले होते. त्याचबरोबर त्याने 73 वं शतक पुर्ण (Virat Kohli 73th Century) केलं. तर विराट कोहलीने वनडेमधील 45 वं शतक ठोकलं होतं. त्यामुळे त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या महान रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

दुसऱ्या सामन्यात कोहली क्लिन बोल्ड

विराट कोहलीचा बोल्ड होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. कोहली पूर्णपणे फसला कारण बोल्ड आऊट झाल्यावर कोहलीही शॉक झालेला दिसला. कोहलीला बाद करणाऱ्या लाहिरू कुमाराने जोरदार सेलिब्रेशन केलं. लक्ष्याचा पाठलाग करताना आणखी एका शतकाला गवसणी घालणार असं सर्वांना वाटत होतं. मात्र कुमाराने कोहलीला बाद करत टीम इंडियाला धक्का दिला.