भारताचा विजयाचा हिरो शार्दुल ठाकूरसाठी विराटचं मराठीमध्ये ट्विट

रोमांचक मॅचमध्ये भारताचा विजय, सीरिजही जिंकली

Updated: Dec 23, 2019, 04:19 PM IST
भारताचा विजयाचा हिरो शार्दुल ठाकूरसाठी विराटचं मराठीमध्ये ट्विट

कटक : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये भारताचा ४ विकेटने रोमांचक विजय झाला. याचबरोबर भारताने ३ वनडे मॅचची सीरिज २-१ने जिंकली. शेवटच्या काही ओव्हरमध्ये भारत ही मॅच गमावेल असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजाने भारताला जिंकवून दिलं. रवींद्र जडेजाने ३१ बॉलमध्ये नाबाद ३९ रन केले तर शार्दुल ठाकूरने ६ बॉलमध्ये १७ रनची खेळी केली. ठाकूरच्या या खेळीमध्ये २ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता.

शार्दुल ठाकूरच्या या खेळीनंतर विराटनेही त्याचं कौतुक केलं आहे. विराट कोहलीने शार्दुल ठाकूरचं मराठीमध्ये कौतुक केलं आहे. 'तुला मानलं रे ठाकूर', असं ट्विट विराटने केलं आहे. सोबतच विराटने शार्दुलसोबतचा एक फोटोही शेयर केला आहे.

वेस्ट इंडिजने दिलेल्या ३१६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि केएल राहुलने भारताला १२२ रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन दिली. रोहित शर्मा ६३ रनवर आणि केएल राहुल ७७ रनवर माघारी परतला. यानंतर विराट कोहलीनेही ८५ रनची खेळी केली, पण तो चुकीच्या वेळी आऊट झाला. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी ७-७ रनची खेळी केली. तर केदार जाधव ९ रनवर माघारी परतला.