मुंबई : विराट कोहली नेहमी त्याच्या वेगळ्या आक्रामक शैलीत मैदानावर उतरतो. कोहली कर्णधार असताना अनेक खेळाडू होते ज्यांना टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यातील एक खेळाडू म्हणजे कुलदीप यादव. मात्र आजच्या सामन्यात रोहित शर्मा कुलदीपला टीममध्ये घेऊन त्याचं करियर एका अर्थाने वाचवणार आहे.
रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या तयारीत आहे. यासाठी श्रीलंकेची सिरीज फार महत्त्वपूर्ण मानली जातेय. त्यामुळे या काळात प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या सिरीजमध्ये कर्णधार रोहित शर्मा युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीपला संधी देऊ शकतो.
कुलदीप यादव गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याला एकाद-दुसऱ्या सामन्यात संधी देण्यात येते. मात्र त्यानंतर काही कारण नसताना त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. कुलदीप भारतातील चायनामॅन गोलंदाजांसारखा आहे.
भारतातील खेळपट्टी ही नेहमीच स्पिनर्ससाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. या खेळपट्टींवर कुलदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. काही काळापासून कुलदीप दुखापतग्रस्ती होता. मात्र त्यावर मात करत त्याने टीममध्ये कमबॅक केलं आहे.
कुलदीप यादव टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. त्याने 7 टेस्ट सामन्यांमध्ये 26 विकेट्स घेतले आहेत. तर 22 टी-20 सामन्यांमध्ये 41 विकेट्स पटकावले आहेत. याशिवाय 65 वनडे सामन्यांमध्ये 107 विकेट्स त्याच्या नावे आहेत. त्याचप्रमाणे आयपीएलच्या 50 सामन्यांमध्ये 40 विकेट्स त्याने घेतलेत.