विराट कोहलीने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, किंमत एकूण थक्क व्हालं

Virat Kohli New Villa : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)अलिबागमध्ये आलिशान बंगला (Alibaug Villa)खरेदी केला आहे. अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटांचा हा व्हिला विकत घेतला आहे. विराट कोहलीची ही अलिबाग परिसरातील दुसरी मालमत्ता आहे. 

Updated: Feb 24, 2023, 02:42 PM IST
विराट कोहलीने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, किंमत एकूण थक्क व्हालं  title=

Virat Kohli New Villa : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)अलिबागमध्ये आलिशान बंगला (Alibaug Villa)खरेदी केला आहे. अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटांचा हा व्हिला विकत घेतला आहे. विराट कोहलीची ही अलिबाग परिसरातील दुसरी मालमत्ता आहे. नेमक्या हा आलिशान व्हिला कसा आहे? या व्हिलाची किंमत किती आहे? हे जाणून घेऊयात. 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli)ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत सध्या वस्त आहे. त्यामुळे त्याचा भाऊ विकास कोहली नोंदणीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात गेला होता. कोहलीने या व्यवहारासाठी 36 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले. या डीलमध्ये विराटला 400 स्क्वेअर फूटचा स्विमिंग पूलही मिळणार आहे, अशी माहिती अॅडवोकेट महेश म्हात्रे यांनी दिली. 

नैसर्गिक सौंदर्यामुळे हे निवासस्थान पसंतीचे ठिकाण आहे. मांडवा जेटीपासून राहण्याची व्यवस्था ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. स्पीड बोटीने मुंबईचे अंतर आता 15मिनिटांवर आणले आहे, अशी माहिती महेश म्हात्रे यांनी दिली आहे. 

बंगल्याची किंमत किती? 

विराट कोहलीने (Virat Kohli) 23 फेब्रुवारी रोजी आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटाचा व्हिला विकत घेतला आहे. अलिबाग परिसरात असलेल्या या लक्झरी व्हिलाची किंमत 6 कोटी रुपये आहे. अलिबाग परिसरात असलेला विराटचा हा व्हिलाही अतिशय आलिशान आहे. यापूर्वी त्यांनी पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईतील वरळी भागातील ओंकार टॉवरमध्ये घर खरेदी केले होते. 

अलिबागमध्ये दुसरी मालमत्ता

विराट कोहलीने (Virat Kohli) अलिबाग परिसरात खरेदी केलेली ही दुसरी मालमत्ता आहे. 1 सप्टेंबर 2022 रोजी, विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी गिरड गावात 36,059 चौरस फूट पसरलेले फार्महाऊस 19.24 कोटी रुपयांना विकत घेतले होते.समीरा लँड अॅसेट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सोनाली राजपूत यांच्याकडून खरेदी केली होती. विराटचा भाऊ विकास कोहली त्याच्या वतीने अधिकृत स्वाक्षरी करणारा ठरला. त्यावेळी त्यांनी 1.15 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले होते. अलिबागमधील दोन्हीही बंगले खुप आलिषान आहेत.

दरम्यान टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळते आहे. कांगारू संघाला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. या (India vs Australia) सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता आहे.