रवी शास्त्रींनी केली विराटची 'या' पाकिस्तानी खेळाडूशी तुलना

भारतीय क्रिकेट संघांचे कोच रवी शास्त्री यांनी पुन्हा विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

Updated: Mar 5, 2018, 06:36 PM IST
रवी शास्त्रींनी केली विराटची 'या' पाकिस्तानी खेळाडूशी तुलना  title=

कोलकत्ता : भारतीय क्रिकेट संघांचे कोच रवी शास्त्री यांनी पुन्हा विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

नुकताच भारतीय संघ विराटच्या कर्णधारपदाखाली दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे आणि टी20 सीरीज खेळून आणि जिंकून परतला आहे. 

इम्रान खानशी तुलना  

रवी शास्त्रींच्या मते विराट हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे. रवी शास्त्रीनी विराटची तुलना पाकिस्तानचे पूर्व कर्णधार इम्रान खान यांच्याशी केले आहे.  

महान खेळाडूसोबत बरोबरी  

रवी शास्त्री यांनी इम्रान खान आणि विराटची तुलना केली आहे. विराट अजूनही तरूण आहे पण इतक्या कमी वयातही त्याच्या खेळामुळे त्याची तुलना अनेक दिग्गज खेळाडूंसोबत होत आहे. 

टीमचे नेतृत्त्व करण्याच्या बाबतीत इम्रान खान आणि विराट कोहली यांच्यामध्ये अनेक समान गुण आहेत. असे म्हणत रवी शास्त्रींनी विराटचे कौतुक केले आहे.  

500 धावांचा टप्पा पार  

नुकताच दक्षिण आफ्रिकेमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटने 500 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा विराट हा पहिलाच खेळाडू आहे. 

इम्रान आणि विराटमध्ये समान गुण कोणते ? 

इम्रान आणि विराटमध्ये समानता पहायला गेल्यास दोघांमध्येही वर्चस्व राखण्याची क्षमता आहे. विराट कोहलीदेखील इम्रानप्रमानेच त्याच्यातील पॉझिटीव्हिटी दुसर्‍यांना देऊ शकतो. यामुळे संघामध्ये चैतन्य निर्माण  होण्यासाठी मदत होते.  

धोनीचा केला बचाव  

रवी शास्त्री यांनी एम एस  धोनीच्या टीकाकारांनाही उत्तर दिले आहे. धोनीकडे असलेला अनुभव इतर खेळाडूंकडे नाही. त्याचा फायदा संघाला होतो. सोबतच या टप्प्यावर त्याच्याकडे असलेला फीटनेस वाखाण्यजोगा आहे.