Virat kohli चा युकेत रोमान्स, Anushka ने फोटो शेअर करताच रणवीर सिंगने दिली अशी प्रतिक्रिया

विराट आणि अनुष्का त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या बोलायचं टाळतात. पण अनेकदा सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत चाहत्यांची मनं जिंकतात.

Updated: Sep 12, 2022, 07:18 PM IST
Virat kohli चा युकेत रोमान्स, Anushka ने फोटो शेअर करताच रणवीर सिंगने दिली अशी प्रतिक्रिया title=

Virat Kohli And Anushka Sharma Romance In UK: आशिया कपनंतर विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. तसं पाहिलं तर विराट आणि अनुष्का त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या बोलायचं टाळतात. पण अनेकदा सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत चाहत्यांची मनं जिंकतात. यावेळी देखील अनुष्का शर्माने पती आणि क्रिकेटर विराट कोहलीसोबतचे यूकेमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विराट अनुष्कासोबत कॅफेमध्ये  रोमँटिक कॉफी डेटचा आनंद घेताना दिसत आहे. 

फोटोमध्ये दोघांनी हातात कॉफीचे मग घेतले आहेत आणि एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. रोमँटिक रोडसाइड कॅफेमध्ये कॉफी डेटचा आनंद घेत असलेले विराट आणि अनुष्काचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. याशिवाय अनुष्का आणि विराटने एक सेल्फीही क्लिक केला आहे. या सेल्फीमध्ये हे दोन्ही कपल एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. फोटो अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हार्ट आयकॉनसह शेअर केली आहेत. या फोटोंवर रणवीर सिंग, शिबानी दांडेकर आणि झोया अख्तर यांनीही हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. यूजर्स दोघांच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आशिया चषक स्पर्धेत विराटने त्याचे 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. त्याच्या 71 व्या शतकावर प्रतिक्रिया देताना अनुष्काने एक पोस्ट करत लिहिलं होतं की, “तुझ्यासोबत कायम..”. अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये तिच्या आगामी 'चकडा एक्स्प्रेस' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंगदरम्यान अनुष्काने वेळ काढला आणि विराट कोहलीसोबत रोमँटिक कॉफी डेटवर गेली. 'चकडा 'एक्सप्रेस' या चित्रपटाद्वारे 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती क्रिकेटर झुलन गोस्वामीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.