किती वर्ष क्रिकेट खेळणार? विराटनं दिलं उत्तर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 18, 2018, 07:31 PM IST
किती वर्ष क्रिकेट खेळणार? विराटनं दिलं उत्तर  title=

सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे. शेवटच्या वनडेमध्ये कोहलीनं ९६ बॉल्समध्ये नाबाद १२९ रन्स करुन भारताचा विजय निश्चित केला. विराटचं वनडे क्रिकेटमधलं हे ३५वं शतक होतं. तर सीरिजमध्ये विराटनं ३ शतकं झळकावली. विराटच्या या जबरदस्त फॉर्ममुळे भारतानं वनडे सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेला ५-१नं हरवलं. २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरिज जिंकण्यात यश आलं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज संपल्यावर विराट कोहलीनं त्याच्या निवृत्तीविषयी भाष्य केलं आहे. माझ्यामध्ये अजून ८-९ वर्षांचं क्रिकेट बाकी आहे. मी प्रत्येक दिवशी सर्वोत्तम कामगिरी करु इच्छीतो. मी पूर्णपुणे फिट असून देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे, असं कोहली म्हणालाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ६ वनडेच्या सीरिजमध्ये विराट कोहलीनं १८६ च्या सरासरीनं ५५८ रन्स केल्या.

१) रोहितचा रेकॉर्ड तोडला

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने वन-डे क्रिकेट सीरिजमध्ये ५०० रन्स बनवले. यासोबतच त्याने रोहित शर्माचा रेकॉर्ड तोडला. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरोधात २०१३-१४ मध्ये ६ मॅचेसच्या सीरिजमध्ये ४८१ रन्स केले होते.

२) सीरिजमध्ये ५०० रन्स बनवणारा पहिला खेळाडू

द्विपक्षीय सीरिजमध्ये ५०० रन्स बनवणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. सर्वात आधी द्विपक्षीय सीरिजमध्ये ३०० रन्स बनवण्याचा रेकॉर्ड जहीर अब्बास यांनी १९८२ मध्ये भारताविरोधात केला होता. त्यानंतर १९८५ मध्ये वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेंसने ४०० रन्सचा कारनामा केला. आता विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सीरिजमध्ये ५०० रन्स केले आहेत. एका सीरिजमध्ये इतके रन्स बनवणारा तो पहिला बॅट्समन ठरला आहे.

४) कॅप्टनची सर्वात वेगाने शतक

कॅप्टन म्हणून सर्वात वेगवान शतक बनवणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली दाखल झाला आहे. ज्या वेगाने विराट खेळत आहे तो पाहता लवकरच रिकी पाँटिंगलाही मागे टाकेल असे दिसत आहे. रिकी पाँटिंगने कॅप्टन असताना २२० इनिंग्समध्ये २२ शतकं केली आहेत. तर विराटने कॅप्टन असताना ४६ इनिंग्समध्ये १३ शतकं केली आहेत.