आता विराटच्या पुढे फक्त सचिन आणि पॉटिंग

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत ७७ बॉल्समध्येच शतक पूर्ण केलं.

Updated: Aug 31, 2017, 05:35 PM IST
आता विराटच्या पुढे फक्त सचिन आणि पॉटिंग

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत ७७ बॉल्समध्येच शतक पूर्ण केलं. विराटचं वनडे क्रिकेटमधलं हे २९वं शतक होतं. ९६ बॉल्समध्ये १३१ रन्स करून विराट कोहली आऊट झाला.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वनडेमध्ये सचिनची ४९, पॉटिंगची ३० शतकं आहेत. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या २८ शतकांचा रेकॉर्ड विराटनं मोडला आहे. सचिन तेंडुलकरनं ४५२ इनिंग्समध्ये ४९, रिकी पॉटिंगनं ३६५ इनिंगमध्ये ३० तर विराटनं फक्त १८५ इनिंगमध्येच २९ शतकं पूर्ण केली आहेत.