2019 च्या वर्ल्डकप ट्रॉफीसोबत विराटने काढले फोटो

विराटने वर्ल्डकपसोबत काढले फोटो

Updated: Jan 11, 2019, 02:04 PM IST
2019 च्या वर्ल्डकप ट्रॉफीसोबत विराटने काढले फोटो

सिडनी : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासोबत सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या वनडे सिरीजचा पहिला सामना 12 जानेवारीला खेळला जाणार आहे. भारताने टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला आहे. आता वनडेमध्य़े देखील विजयासाठी भारतीय टीम तयार झाली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली वनडे सिरीज जिंकण्य़ासाठी सज्ज झाला आहे. सिडनी वनडेच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने म्हटलं की, त्याचं संपूर्ण फोकस आता वर्ल्डकप 2019 वर आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचसह वर्ल्डकप ट्रॉफी सोबत फोटो काढले. भारताचा 12 जानेवारीला ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. 18 जानेवारीला शेवटचा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारताचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे. यानंतर टीम इंडिया भारतात देखील ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामने खेळणार आहे.

2019 मध्ये विराटसमोर सर्वात मोठं आव्हान इंग्लंडचं असेल. इंग्लंडमध्ये यंदाचं वर्ल्डकप रंगणार आहे. ही वनडे सिरीज कोहलीची लिटमस टेस्ट असणार आहे. 2019 वर्ल्डकप कोहलीसाठी खास असणार आहे. कपिल देव आणि महेंद्र सिंह धोनी नंतर भारतासाठी वर्ल्डकप जिंकण्याची मोठी संधी त्याच्याकडे असणार आहे.

1983 मध्ये कपिल देव यांनी भारतासाठी पहिला वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षानंतर महेंद्र सिंह धोनीने 2011 मध्ये दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला. आता 8 वर्षानंतर विराटकडे पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. भारत जर 2019 चा वर्ल्डकप जिंकतो तर वर्ल्डकप जिंकणारी भारतीय टीम ऑस्ट्रेलियानंतर सगळ्यात यशस्वी टीम बनेल.