close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विराट कोहलीचा हा नवीन लूक बघितलात का?

आयपीएलच्या या मोसमात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

Updated: Apr 18, 2019, 08:40 PM IST
विराट कोहलीचा हा नवीन लूक बघितलात का?

मुंबई : आयपीएलच्या या मोसमात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूची कामगिरी निराशाजनक झाली आहे. असं असलं तरी बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली मात्र सोशल नेटवर्किंगवर झळकताना दिसत आहे. विराट कोहलीने पंजाबी वेशभूषा असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये विराट कोहलीनं पठाणी परिधान केली आहे, तर डोक्यावर गुलाबी रंगाची पगडी घातली आहे. हात जोडून विराटने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये विराटने '''Sat Shri Akal saarreyaan nu!'' असं लिहिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sat Shri Akal saarreyaan nu!

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

२४ तासांच्या आत विराटच्या या नव्या लूकला २४ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. एवढच नाही तर हजारो यूजरनी विराटच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. काहींनी विराटच्या या लूकचं कौतुक केलं आहे. तर बंगळुरूच्या आयपीएलमधल्या कामगिरीमुळे काहींनी विराटला ट्रोलही केलं आहे.

'बंगळुरू एवढ्या मॅच हरली आहे की विराट हसणं विसरला आहे. जोपर्यंत जिंकत नाही, तोपर्यंत पोस्ट करू नका,' अशा वेगवेगळ्या कमेंट विराटच्या या फोटोवर आल्या आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरूला ८ पैकी ७ मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. २ अंक मिळवलेली बंगळुरूची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. बंगळुरूचं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशाही जवळपास मावळल्या आहेत. आयपीएल संपल्यानंतर विराटच्या नेतृत्वात भारतीय टीम इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपसाठी रवाना होईल. ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.