याबाबतीत सचिन तेंडुलकरच्या पुढे निघून गेला कोहली

श्रीलंकेच्या विरोधात वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये पाचव्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने ३० वे शतक ठोकले. या शतक सोबतच त्याने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक शतक बनवण्याच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगची बरोबरी केली आहे. आता तो फक्त भारताचा  दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत.

Updated: Sep 4, 2017, 11:10 AM IST
याबाबतीत सचिन तेंडुलकरच्या पुढे निघून गेला कोहली title=

मुंबई : श्रीलंकेच्या विरोधात वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये पाचव्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने ३० वे शतक ठोकले. या शतक सोबतच त्याने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक शतक बनवण्याच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगची बरोबरी केली आहे. आता तो फक्त भारताचा  दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत.

पण एका गोष्टीमध्ये कोहलीने सचिनला मागे टाकलं आहे. कोहलीने त्याच्या १९४ व्या वनडे सामन्यामध्ये १८६ व्या इनिंगमध्ये हे ३० वे शतक ठोकले आहे. ६.१ च्या रनरेटने विराटने हे शतकं पूर्ण केली आहेत. ऐवढ्याच इनिंगमध्ये सचिनने १६ तर रिकी पॉटिंगने १५ शतकं लगावली होती. म्हणजेच कोहली सचिनच्या बऱ्याच पुढे निघून गेला आहे. पण तेवढ्याच इनिंगमध्ये कोहलीने मात्र ३० शतके ठोकली आहेत