विराट कोहलीच्या हिडन टॅलेंट बद्दलं तुम्हाला माहित आहे? हा टॅलेंट पाहून अनुष्कालाही आवरले नाही अश्रू

क्रिकेटच्या मैदानावर सिक्स आणि चौके ठोकणार्‍या विराटमध्ये एक खास टॅलेंन्ट आहे.

Updated: Apr 28, 2021, 03:24 PM IST
विराट कोहलीच्या हिडन टॅलेंट बद्दलं तुम्हाला माहित आहे? हा टॅलेंट पाहून अनुष्कालाही आवरले नाही अश्रू

मुंबई : सेलेब्रीटीमधील सगळ्यांची आवडती जोडी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे नेहमीच त्यांच्या चाहत्यांना आपल्या पद्धतीने मनोरंजन करत असतात. त्यामुऴे ते त्यांच्या प्रत्येक चाहत्यांचे मनं जिंकतात. ते जे काही व्हिडीओ शेअर करतात चाहात्यांना ते खूप आवडतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो views मिळतात. मग त्यात मैदानातून विराटला किस करणारी अनुष्का असो किंवा आपल्या नवऱ्याची कॅापी करणारी अनुष्का असो. लोकांनी हे सगळे काही पसंत केले आहे.

क्रिकेटच्या मैदानावर सिक्स आणि चौके ठोकणार्‍या विराटमध्ये एक खास टॅलेंन्ट आहे, ज्याची माहिती बर्‍याच लोकांना नाही. पण काळजी करू नका, कारण विराटचा हा हिडन टॅलेंट चा खुलासा आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत.

विराट कोहली चांगला क्रिकेट तर खेळतोच त्याच बरोबर तो एक चांगला गायकही आहे. तुमचा विश्वास नाही बसला ना यावर? आमच्याकडे याचा व्हिडीओ देखील आहे. तो ऐका आणि तुम्हीच ठरवा की, विराट किती चांगले गातो ते.

हा व्हिडीओ तसा जुणा आहे. अनुष्का आणि विराटच्या लग्नाच्या वेळेचा हा व्हिडीओ आहे. त्यावेळेला विराटने अनुष्कासाठी एक गाणे गायले होते, त्याचाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे गाणे ऐकल्यानंतर अनुष्का भावूक झाली.

सन 2017 मध्ये अनुष्का-विराटच्या लग्नाच्या वेळी विराटने सर्वांसमोर अनुष्कासाठी "मेरे मेहबूब कयामत होगी" हे गाणे गायले होते. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बरेच पाहुणे बसलेले दिसत आहेत आणि विराट अनुष्कासाठी गाणं गात आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का भावनिक दिसत आहे. विराटने गाणे संपवताच, त्यानंतर सर्वजण त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवू लागतात.

विराट आणि अनुष्का 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नात केवळ काही खास मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. विराट-अनुष्का आता एका गोंडस मुलीचे पालक बनले आहेत. अनुष्काने नुकतेच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दोघेही आपल्या वामिकाला सोशल मीडिया आणि फोटोग्राफरपासून दूर ठेवतात.

वामिकाच्या नावाने अर्धशतक

विराट कोहलीने अलीकडेच जेव्हा आयपीएलच्या या 14 सीझनमधील पहिले अर्धशतक झळकावले होते. त्या अर्धशतकासाठी विराटने आपल्या लाडक्या वामिका श्रेय दिले आहे. त्यावेळी ते शतक मारल्या नंतर विराटने स्टेडीयमध्ये वाल्मीकाला फ्लांइंग किसं दिला आणि तिला आपल्या पुढ्यात उचलून घेण्याचा इशारा केला. हा व्हिडीओ देखील लोकांना खूप आवडला. लोकांनी त्या व्हिडीओला खूप शेअर केले आहे.