दिग्गज खेळाडूसोबत विराटचा वाद पुन्हा चव्हाट्यावर...

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर दोन कसोटी सामने जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. 

Updated: Dec 31, 2021, 09:16 AM IST
दिग्गज खेळाडूसोबत विराटचा वाद पुन्हा चव्हाट्यावर... title=

दिल्ली : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर बॉक्सिंग डे कसोटीमध्ये 113 रन्सनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने एक नवा इतिहास रचला आहे. या विजयासह विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर दोन कसोटी सामने जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. मात्र असं असून देखील विराट आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील मदभेत संपलेले दिसत नाही.

पुन्हा एकदा गांगुली आणि कोहली यांच्यातील नाराजी खुलेपणाने समोर आलेली आहे. कोहलीपूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत 1-1 कसोटी सामने जिंकले आहे. कालच्या विजयानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या, मात्र यावेळी विराट कोहलीचं नावही त्यांनी घेतलं नाही.

सौरव गांगुली यांनी शुभेच्छा देताना ट्विटमध्ये इतिहास रचणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख केला नाही. तर दुसरीकडे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यातील शानदार विजयासाठी टीम इंडिया आणि विराट कोहली दोघांचेही अभिनंदन केलं आहे.

गांगुलीने ट्विटरवर लिहिलं की, "टीम इंडियाचा मोठा विजय झाला आहे. या निकालाने अजिबात आश्चर्य वाटलं नाही. या मालिकेत भारताला पराभूत करणं खूप कठीण असणार आहे."

भारताला पराभूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला खूप चांगली कामगिरी करावी लागेल. नवीन वर्षाचा आनंद घ्या, असंही या गांगुली यांनी नमूद केलं आहे. 

तर माजी कोट रवी शास्त्री यांनी ट्विट केलं की, ''वाह ब्रिस्बेन, ओव्हल, लॉर्ड्स आणि आता सेंच्युरियन. कोहली, राहुल द्रविडचं अभिनंदन. सेंच्युरियनमध्ये जिंकणारा पहिला आशियाई देश अशी नोंद झाल्यामुळे संपूर्ण टीमचं अभिनंदन."