धोनीनंतर 'या' स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत

यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतच बाहेर पडलीय. संघाला मिळालेलं नवं नेतृत्व आणि पुन्हा महेंद्र सिंह धोनीकडे MS Dhoni आलेली कर्णधार पदाची धूरा, या सर्व घटनांमुळे चेन्नई कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. त्यात धोनीसाठी हा शेवटचा हंगाम आहे.

Updated: May 14, 2022, 04:51 PM IST
धोनीनंतर 'या' स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत  title=

मुंबई : यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतच बाहेर पडलीय. संघाला मिळालेलं नवं नेतृत्व आणि पुन्हा महेंद्र सिंह धोनीकडे MS Dhoni आलेली कर्णधार पदाची धूरा, या सर्व घटनांमुळे चेन्नई कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. त्यात धोनीसाठी हा शेवटचा हंगाम आहे.

धोनीचा पर्याय म्हणून रवींद्र जाडेजाची कर्णधार पदासाठी चाचपणी झाली. मात्र यात तो Out झाला. त्यामुळे आता चेन्नई नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. Out झालेल्या रवींद्र जाडेजा ऐवजी नवीन ओपनिंग कॅप्टनच्या शोधात असलेल्या चेन्नईला भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने भविष्यवाणी करत एक नाव सुचवले आहे. सेहवागने सुचवलेल्या या नावावर आता चेन्नई शिक्कामोर्तब करते का ? हे पहावे लागणार आहे.  

IPL 2022 च्या सुरुवातीला महेंद्रसिंग धोनी MS Dhoniने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली. मात्र नुकत्याच काही सामन्यापूर्वी जाडेजाने  कर्णधारपद सोडलं आणि धोनीच्या हाती
 पुन्हा कर्णधार पदाची जबाबदारी आली. मात्र तो निव्वळ या हंगामापूरतीच जबाबदारी स्विकारणार आहे.  त्यामुळे पुढच्या हंगामात नवीन कर्णधार कोण असेल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग नेहमीच भविष्यवाणी करत असतो. आता त्याने चेन्नईच्या कर्णधार पदाबाबत भविष्यवाणी केली आहे.  ऋतुराज गायकवाडमध्ये संघाचा पुढचा कर्णधार होण्याची क्षमता आहे. चांगला कर्णधार होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण त्याच्यात आहेत. 
तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कर्णधार आहे, त्यामुळे त्याला सामन्यावर नियंत्रण कसे ठेवायचे हे माहित आहे. चेंडू कोणाला द्यायचा, फलंदाजीच्या क्रमात कोणते बदल करायला हवेत. याची त्याला कल्पना आहे, असे सेहवाग म्हणालाय. 

पुढे सेहवाग म्हणाला, 'तो महाराष्ट्राचा खेळाडू आहे. तो खूप शांतपणे खेळतो. त्याने शतक झळकावले असो वा शून्यावर बाद असो, त्याची प्रतिक्रिया सारखीच असते असे दिसते.शतक झळकावताना तो आनंदी आहे की शून्यावर बाद झाल्यामुळे दुःखी आहे हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही.
 "कोणाचाही हंगाम चांगला असू शकतो, परंतु जर त्याने 3-4 हंगाम चांगले खेळले तर तो महेंद्रसिंग धोनीनंतर बराच काळ कर्णधार होऊ शकतो."

ऋतुराज गायकवाडची कामगिरी

ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकली होती.  यावर्षी त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव नक्कीच आहे. 
तरीही तो चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x